महाराष्ट्रात वर्षभरात १७ हजार क्षयरुग्ण वाढले

क्षयरोगाला नियंत्रण आणण्यात यशस्वी ठरल्याचे महाराष्ट्र सरकारचे दावे फोल ठरले आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात क्षयरुग्णांच्या संख्येत १७ हजाराने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

टीबीवरील उत्तम उपचारासाठी मुंबई संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे चांगला उपचार मिळावा म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. दुसऱ्या राज्यातून मुंबईत लोक उपचारासाठी येत असल्याने महाराष्ट्राचा क्षयरोगाचा आकडा वाढल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.

खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना नोटीफाय करण्यास आम्ही सर्वप्रथम सुरुवात केली. त्याचप्रमाणे क्षयरुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्याबाबत केंद्र सरकारने अनेक योजनाही तयार केल्या आहेत. टीबी रुग्ण शोधण्यासाठी दरवर्षी तीन विशेष मोहिमा सुरू करण्यात येतात. यावर्षी एप्रिलमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. २० राज्यांमध्ये ही मोहीम घेतली होती. त्यात २१०० टीबीचे रुग्ण आढळले. या रुग्णांना क्षयरोग झाला होता आणि त्यांना त्याची माहितीही नव्हती, असं महाराष्ट्राचे आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *