पिंपरी-चिंचवड : वाकड रोड येथे दोन दिवसांपूर्वी वडापावची गाडी बंद करून घरी निघालेल्या मायलेकीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावयास पकडण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरूनच हे कृत्य केल्याच कबुली जावयाने दिल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.
गणेश परशुराम राठोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमध्ये कोयल परदेशी, योगिता परदेशी या मायलेकी जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी कोयल हिने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश परदेशी हा योगिता परदेशी यांचा जावई आहे. योगिता परदेशी यांचा अष्टविनायक कॉलनी रोडवर वडापाव विकण्याचा व्यवसाय आहे. या ठिकाणी रोज दुपारी चार वाजता वडापावची गाडी लावून व्यवसाय करतात. जवळच अष्टविनायक कॉलनीमध्ये राहत आहेत. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हातगाडी बंद करून या मायलेकी घरी जात होत्या. जावई गणेश परदेशी आणि योगीता परदेशी यांच्यात यापूर्वी कौटुंबिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरुन त्याने पाठीमागून येवून सासूच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये सासू 55 टक्के भाजली होती. आईला वाचवण्यासाठी गेलेली कोयल ही 15 टक्के भाजली आहे. दोघींना ही पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी चार दिवसात आरोपीचा शोध लावला. घटनेतील दोन्ही आरोपी फरार होते. परंतु, पोलिसांनी बेसावध ठेवून आरोपीला गजाआड केले.