फूड डिलिव्हरी बॉयसाठी दरवाजा उघडणाऱ्या प्रॉपर्टी डिलरची गोळ्या झाडून हत्या

अमित कोचर या प्रॉपर्टी डिलरने ऑनलाईन जेवण मागवले. दरवाजावर बेल वाजली तेव्हा त्याला असे वाटले की डिलिव्हरी बॉय आला आहे. मात्र त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्याला काही गुंडांनी त्याला घराबाहेर खेचले आणि कारमध्ये नेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दिल्लीतल्या विकासपुरी भागात ही घटना घडली.

अमित कोचर याच्या घरी त्याचे दोन मित्र गुरूवारी रात्री आले होते. त्याची पत्नी कामावर गेली होती. कोचर आणि त्याच्या मित्रांनी ऑनलाईन अन्न मागवले. काही वेळाने फ्लॅटची बेल वाजली. फूड डिलिव्हरी बॉय आला असे वाटून अमित कोचर याने दरवाजा उघडला. तेव्हा काही लोकांनी त्याला बाहेर खेचले आणि कारजवळ घेऊन गेले. कारमध्ये अमित कोचरला ढकलले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अमितवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्याचे मित्र त्याच्या घरात होते .

जेव्हा अमित कोचर आला नाही आणि गोळीबाराचा आवाज त्याच्या मित्रांनी ऐकला तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन पाहिले. जिथे त्यांना कळले की अमित कोचरवर गोळीबार झाला आहे. त्यांनी तातडीने त्याला डीडीयू रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अमित कोचरच्या मित्रांची चौकशी केली जाते आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपसाले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *