अपघातग्रस्त एएन-३२मधील शहिदांचे मृतदेह हाती

अपघातग्रस्त एएन-३२मधील शहिदांचे मृतदेह हाती

अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या भारतीय वायूदलाच्या एएन-३२ या विमानातील सर्व कर्मचारी आणि प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या विमानातील १३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. भारतीय वायूदलाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. मृतांमध्ये जी.एम. चार्ल्स, एच. विनोद, आर. थापा, ए. तन्वर, एस. मोहंती, एम.के गर्ग, के.के. मिश्रा, अनुप कुमार, शेरीन, एस.के. सिंग, पंकज, पुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे.

हवाई दलाचे शोध पथक गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त एएन-३२च्या घटनास्थळावर पोहोचले. भारतीय लष्कराने विमानातील सर्व १३ जणांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आहे. घटनास्थळाहून सर्व १३ शहिदांचे मृतदेब सापडले असून ते विशेष हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशमध्ये आणण्यात येणार आहेत. तसेच घटनास्थळाहून दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे.

३ जून रोजी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या एएन-३२चे अवशेष ११ जून रोजी अरुणाचल प्रदेशातील टेटो परिसरात सापडले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र खराब हवामानामुळे तिथे पोहोचता येत नव्हते. बुधवारी १५ गिर्यारोहकांना एमआय-१७s आणि एडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळाच्या जवळ पोहोचवण्यात यश आले. त्यानंतर शोध घेतल्यानंतर १३ जणांचे शव सापडले.

या दुर्घटनेत शहीद झालेल्यांमध्ये हवाई दलाचे सहा अधिकारी आणि सात एअरमन आहेत. या दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्काडर्न लिडर एच विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर थापा, फ्लाईट लेफ्टनंट ए तन्वर, फ्लाईट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, अनूप कुमार, शेरिन, लीड एअरक्राफ्ट मॅन एसके सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, पुताली आणि राजेश कुमार हे शहीद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *