राज ठाकरेंनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज यांनी सिद्धिविनायकाला पंचांग प्रणाम केला. या वेळी त्यांच्या सोबत पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे  , शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण करत श्री सिद्धिविनायकाचे आशिर्वाद घेतले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर त्याना शुभेच्छा देण्यासाठी मुंबई, तसेच राज्यातील अनेक ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरवर्षी १४ जून या राज यांच्या वाढदिवसादिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते गर्दी करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *