संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ निघालेल्या एसटी बसला शनिवारी सकाळी ५.३० च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. एसटी डेपो बाहेर पडत असतानाचा मुंबईहून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आराम बसने एसटीला जोरदार धडक दिली.
संगमेश्वर एसटी डेपो बाहेरच हा अपघात झाला. एसटी डेपो महामार्गाला लागून आहे.या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नसून जखमी प्रवाशांवर संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
