नागपूर जेलमधली 23 वी फाशी?

नागपूर जेलमधली 23 वी फाशी?

याकूब मेमनला 30 जुलै रोजी नागपूर सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं होतं. आता मूळचा नांदेडमधील असलेल्या सुदाम जाधवला फाशी देण्यात येणार आहे. सुदामने 21 ऑगस्ट 2007 रोजी पत्नी आणि चार मुलांची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह माहूर तालुक्यातल्या जुनापानी तलावात फेकून दिलं होतं.

दरम्यान जिल्हा न्यायालयाने 14 साक्षीदार तपासल्यानंतर सुदाम जाधवला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली. तसंच राष्ट्रपतींनीही सुदाम जाधवची दया याचिका फेटाळली. त्यामुळे सुदाम जाधवलाही लवकरच फासावर लटकवलं जाईल.

आपल्या अनैतिक संबंधांमध्ये पत्नी आणि मुलं अडसर ठरत असल्याने त्याने हे कृत्य केलं होतं. याची कबुली त्याने सर्वप्रथम प्रेयसीला दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *