प्रो कबड्डीत यू मुंबाचा सलग आठवा विजय

प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत यू मुंबा संघाची विजयाची घोडदौड सुरुच असून यू मुंबाला रोखणे प्रतिस्पर्धी संघाला कठीण झाले आहे. यू मुंबाने दबंग दिल्लीचा पराभव करीत सलग आठव्या विजयाची नोंद केली. या विजयाबरोबरच यू मुंबाने गुणतालिकेत आपले अव्वल स्थानही कायम राखले आहे.

हैदराबाद येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात यू मुंबाने दंबग दिल्लीवर २९-२४ अशा फरकाने मात केली. यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने पुन्हा एकदा साजेसा खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. प्रो कबड्डी लीगमध्ये आतापर्यंत ८ सामने खेळवले गेले असून या आठही सामन्यात यू मुंबाने सलग आठ विजयाची नोंद केली आहे. यू मुंबा ४० गुणांसह अव्वल स्थानी असून ८ सामन्यात ५ विजय आणि २ पराभवसह २९ गुण मिळवून तेलगू टायटन्स दुसऱ्या स्थानावर तर २५ गुण मिळवून बेंगळूरुचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *