लोकलच्या स्पर्धेत उतरलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मुंबई मेट्रो वनला मंगळवारी तांत्रिक बिघाडाचा प्रचंड फटका बसला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोचा दरवाजा बंद न झाल्याने मेट्रो जागच्या जागी खोळंबल्याने सर्व गाड्यांच्या एकामागोमाग रांगा लागत प्रचंड कोंेडी झाल्याची घटना सकाळी ९.१५च्या सुमारास घडली. गेल्याच महिन्यात मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन प्रवाशांना घाम फुटला होता.
मेट्रोच्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणार्या गाडीचे दरवाजे अचानक बिघडल्याची घटना सकाळी ९.१३ वाजता घडली. हे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याशिवाय ट्रेन सुटू शकत नसल्याने ही ट्रेन ऐन पिकअवरमध्ये रखडली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञांना बोलाविण्यात आले. तोपर्यंत मेट्रोच्या १६ गाड्यांच्या वाहतुकीचे नियोजन कोसळून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
प्रवाशांच्या कोंडीने सरकते जिनेही बिघडले

