मी दिसायला सामान्य महिलेसारखी त्यामुळे कदाचित मला वाईट वागणूक -लिपीका मित्रा

मी दिसायला सामान्य महिलेसारखी त्यामुळे कदाचित  मला वाईट वागणूक -लिपीका मित्रा

दिल्लीची सुरक्षा व्यवस्था दिल्ली सरकारच्या हाती सोपवली तर, सुंदर महिला मध्यरात्री कुठलीही भिती न बाळगता घराबाहेर पडू शकतात असे वक्तव्य सोमनाथ भारती यांनी केले होते. सोमनाथ भारती यांच्या या विधानाचा अनेक संघटनांनी निषेध केला आहे.

दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी महिला सुरक्षेवरुन केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांना त्यांची पत्नी लिपीका मित्रा यांनी टोमणा मारला आहे.

मी सुंदर नाही दिसायला सामान्य महिलेसारखी आहे त्यामुळे कदाचित त्यांनी मला वाईट वागणूक दिली असावी असे लिपीका मित्रा म्हणाल्या.

त्यांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही पण सुंदर महिलांच्या सुरक्षेची काळजी आहे असे लिपीका सोमनाथ भारती यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी लिपीका यांनी सोमनाथ भारतींवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *