ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात 70 मगरींचे कुजलेले शीर फ्रीझरमध्ये सापडले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
डार्विनपासून 40 किमी दूर असलेल्या हम्प्टी डूजवळ काही मुलांना 70 मगरींचे शीर आढळले. याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊल उचललं आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. सॉल्ट वॉटर जातीच्या 50 मगरींसह एकूण 70 शीर कुजलेल्या अवस्थेत आढळले, असं पोलिसांनी सांगितलं.
वाईल्ड लाईफ रेंजरचे वरिष्ठ अधिकारी टॉमी निकोल्स यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. मगरींचे शीर कुजल्यामुळे परिसरात दुर्गंध पसरला होता. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, परंतु प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सॉल्ट वॉटर जातीच्या मगरी मनुष्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. काही कळायच्या आतच त्या हल्ला करतात. दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत दरवर्षी शेकडो जणांना सॉल्ट वॉटर आणि नील मगरींनी खाल्लं होत, यावरुनच त्यांची भीषणता लक्षात येते. अमेरिकन मगर आणि ब्लॅक कॅमन जातीच्या मगरही माणसांसाठी धोकादायक आहेत.
पण आणखी सत्य म्हणजे अनेक ठिकाणी मगरीचं मांसही खाल्लं जातं. शिवाय मगरींच्या कातडीला फॅशन इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी आहे.

