‘नेस्ले‘ची ‘मॅगी‘ खाण्यास अपायकारक नसल्याचा दावा

‘नेस्ले‘ची ‘मॅगी‘ खाण्यास  अपायकारक नसल्याचा दावा

‘गोवा सरकारने जून महिन्यात या संस्थेकडे तपासणीसाठी पाठविलेली ‘मॅगी‘चे नमुने अन्न सुरक्षा मानक आणि 2011च्या नियमानुसार असल्याचा स्पष्ट करण्यात आले आहे,‘‘ अशी माहिती गोवा अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक सलीम व्ही. वेलजी यांनी दिली. भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरणाने विविध प्रकारच्या 9 प्रकारच्या नूडल्सवर देशभर बंदी घातली होंती. प्राधिकरणाच्या या निर्णयाविरुद्ध “नेस्ले‘ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या निर्णयामुळे ‘नेस्ले‘चा शेअर आज (बुधवार) सकाळच्या सत्रात 10.2 टक्के वधारला होता. ऑक्टोबर 2007 पासून म्हणजे आठ वर्षांच्या कालावधीत एका दिवसात (इंट्रा डे) झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात ‘नेस्ले‘च्या शेअर 7000 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. सध्या (10 वाजून 15 मिनिटे) ‘नेस्ले‘चा शेअर 6778.30 रुपयांवर व्यवहार करत असून 424.95 रुपयांनी म्हणजे 6.69 टक्क्यांनी वधारला आहे.
म्हैसूर येथील सरकारी मान्यता असलेल्या सेंट्रल फूड टेक्नॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट प्रयोगशाळेने ‘नेस्ले‘ची ‘मॅगी‘ खाण्यास अपायकारक नसल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे नेस्ले कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *