वडिलांना दुकानावर जात असतांना बाय करायला गेला. अचानक ग्रील वरून हात सुटला अन आईचा काळजाचा ठोकाच थांबलं. चक्क अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरून अंश खाली पडला. तरीही मात्र त्याला काहीच झालं नाही हा चमत्कारचं असल्याचं सर्वांचं मत आहे.
वडिलांना बाय करायला गेला अन् अचानक ग्रीलवरुन हात सुटून दीड वर्षाचा अंश तिसऱ्या मजल्यावरुन थेट खालीच पडला. एक क्षण सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, एखाद्या चमत्काराप्रमाणे एवढ्या मोठ्या अपघातातून अंश सुखरुपपणे बचावला.
अंश संजय गांधी असा हा दीड वर्षाचा चिमुकला नेहमीप्रमाणे वडील दुकानावर जात असताना बाय करायचा. आजही बाय करायला गेला. मात्र, यावेळी त्याच्यासोबत आई नव्हती एवढंच. तो ग्रीलवर चढला आणि त्याने बाय करतानाच अंशचा तोल खाली गेला आणि तो चक्क तिसऱ्या इमारतीवरून खाली पडला. अंशचे वडील खाली उभेच होते. एवढ्यातच अंशाचा आईच्या ओरडण्याचा आवाज आला.
अंश हा खाली झाडासाठी लावणासाठी असलेल्या मातीचा जागेवर पोटावर पडलेला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सर्व तपासणी केली असता त्याला थोड खरचटण्या पलीकडे काहीचं झाल नाही. वरून खाली पडलेला अंश कंपाऊंडच्या भिंतीला लागून झाडे लावण्यासाठी असलेल्या जागेवर पडला. तो इकडे तिकडे पडला असता तर तीन मजल्यावरून पडल्यावर काय होऊ शकत हा विचारसुद्धा अंगावर शहारे आणणारा ठरेल. पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण येथे तंतोतंत खरी ठरते.

