जीव देऊन श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रकार

जीव देऊन श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रकार

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मात्र लाडक्या राष्ट्रपतीच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.

लातूरमधील लेबर कॉलनी भागात ही घटना घडली आहे. निवृत्त पोलिस कर्मचारी जयराम कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कांबळे यांनी डॉ. कलाम यांच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. जीव देऊन मी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘माझ्या निधनाबद्दल कोणीही शोक व्यक्त करु नये, मी अत्यंत आनंदाने डॉ. कलाम यांच्या भेटीला जात आहे’ असं कांबळे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. कांबळे यांनी देहदानाची तजवीज केल्याचा उल्लेखही केला आहे. माझ्या पश्चात कोणत्याही शंका-कुशंका उपस्थित कुटुंबियांना विनाकारण त्रास देऊ नये असंही त्यांनी लिहिलं आहे.

जयराम कांबळे 2003 मध्ये सहाय्यक फौजदार पदावरुन सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. एकीकडे केरळमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी रविवारच्या दिवशीही काम करत डॉ. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली असतानाच जीव देऊन श्रद्धांजली वाहण्याचा प्रकार दुर्दैवी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *