पूल उभारणीसाठी रविवारी मेगाब्लॉक !

प्रभादेवी स्थानकावर पूलाकरीता गर्डर उभारणीसाठी पश्चिम रेल्वेकडून प्रभादेवी ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्याखेरीज चर्चगेट ते मुंबई सेंट्रल तसेच बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष ब्लॉकसह माटुंगा ते मुलुंड आणि वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे.

पश्चिम रेल्वे

प्रभादेवी स्थानकात पूल उभारणीसाठी

स्थानक – प्रभादेवी ते चर्चगेट

वेळ – मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३०

मार्ग – डाऊन धीमा

परिणाम – ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुंबई सेंट्रल- माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म नसल्याने या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

…..

पश्चिम रेल्वे

स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

वेळ – स. १०.३५ ते दु. ३.३५

मार्ग – अप आणि डाऊन जलद

परिणाम – ब्लॉककाळात अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे रविवारी अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

……

मध्य रेल्वे

पुलासंबंधी कामासाठी विशेष ब्लॉक

स्थानक – बदलापूर-कर्जत

वेळ – स. १०.३० ते दु. ३.००

मार्ग – अप आणि डाऊन मार्ग

परिणाम – ब्लॉककाळात अप आणि डाऊन मार्गावरील १६ लोकल फेऱ्यांना फटका बसणार आहे. यात काही लोकल फेऱ्यांचा प्रवास अंबरनाथ, बदलापूर स्थानकात पूर्ण होणार असून याच स्थानकातून पुन्हा सीएसएमटीकडे लोकल रवाना करण्यात येतील.

……

मध्य रेल्वे

स्थानक – माटुंगा ते मुलुंड

वेळ – १०.५७ ते ३.५२

मार्ग – डाऊन धीमा

परिणाम – ब्लॉककाळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर ब्लॉककाळात डाऊन धीमी लोकल थांबणार नाहीत. अप जलद मार्गावरील लोकल सुमारे १५ मिनिटे आणि डाऊन जलद लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

…..

हार्बर रेल्वे

स्थानक – वडाळा रोड ते मानखुर्द

वेळ – स.१०.३४ ते दु. ३.४४

मार्ग – अप आणि डाऊन मार्ग

परिणाम – ब्लॉककाळात सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. ब्लॉककाळात पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बर मार्गावर सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *