अभिनेता शाहरुख खान याला वानखेडे स्टेडिअममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा शाहरुखसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शाहरुख वानखेडे स्टेडिअममध्ये जाऊन सामने पाहू शकणार आहे.
16 मे 2012 रोजी आयपीएल सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर शाहरुख खानची सुरक्षारक्षाकासोबत बाचाबाची झाली होती. त्यावेळी शाहरुखने नियमांचं भंग तर केला होताच, त्याचबरोबर त्याने दिलगिरीही व्यक्त केली नव्हती. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने अर्थात एमसीएने शाहरुखला वानखेडेवर पाच वर्षांची प्रवेशबंदी घातली होती.
मात्र, आता शाहरुख खान वानखेडे स्टेडिअममधील सामन्याचा आनंद लुटताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुख खानवर घातलेली पाच वर्षांची बंदी मागे घेतल्याने शाहरुखला नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

