गोंदिया जिल्ह्यातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

त्रिपुरा स्टेट रायफलच्या ३ बटालियनचे जवान अतिराज भाऊराव भेंडारकर यांचा आजारपणामुळे मृत्यू   झाला असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (दि.२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोंदिया पोलीस मुख्यालयात पोलीस विभागाच्यावतीने शहिदाला आदरांजली वाहण्यात आली. अतिराज आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना २३ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिपुरा येथून त्यांचे पार्थिव विमानाने रायपूर विमानतळावर आणण्यात आले. तेथून गोंदियाला आणण्यात आले आहे. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/ पिंपळगाव येथील रहिवासी असून जन्मगावी त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *