ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्री उशिरा माजी नगरसेवकाची हत्या

परळी नगर पालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची हत्या झालीय. ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय. ही घटना रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमाराला घडलीय. हत्येच नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसून हत्या कुणी केली याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

रात्री उशिरा पांडुरंग गायकवाड यांच्यावर काही अज्ञातांकडून तलवारीनं हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला राजकीय हेतूनं घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड हे परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत. गायकवाड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *