‘पबजी’वर वेळमर्यादा?

तरुण पिढीमध्ये सध्या लोकप्रिय ठरलेल्या पबजी च्या आहारी जाऊन आत्महत्यांत वाढू लागल्याने या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात केवळ सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे.

 गुजरातमधील राजकोट आणि सूरत या दोन शहरात राज्य सरकारने पबजीवर बंदी घातली आहे. तसेच देशातील इतर राज्यांतूनही पबजीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पबजी खेळात तास न् तास वाया घालवणाऱ्यांच्या सवयीवर लगाम लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *