डोक्यात टीव्ही पडून चिमुरड्याचा मृत्यू, लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

डोक्यात टीव्ही पडून चिमुरड्याचा मृत्यू, लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

लोणावळा परिसरात एका चिमुरड्याचा डोक्यात टीव्ही पडून मृत्यू झाला आहे. श्रीयश राठोड असं या लहानग्याचं नावं असून तो लोणावळ्यातील हनुमान टेकडी परिसरात राहात होतं.

शुक्रवारी श्रीयश आपल्या घरात खेळत होता. यावेळी खेळताना टेबलावर ठेवलेल्या टीव्हीला त्याचा धक्का लागला आणि टीव्ही कलंडून त्याच्या डोक्यात पडला.

यामुळे जखमी झालेल्या श्रीयशला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अखेर रविवारी श्रीयसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

श्रीयसच्या पालकांची आर्थिक परिस्थीती हालाखीची असल्यामुळे,  त्याचा उपचाराचा खर्चही माफ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *