सफाई करताना कर्मचारी एस्कलेटरमध्ये अडकला, पाय कापल्यानंतर सुटका

सफाई करताना कर्मचारी एस्कलेटरमध्ये अडकला, पाय कापल्यानंतर सुटका

चीनमधील शॉपिंग मॉलमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याला एस्कलेटरमुळे कायमचं अपंगत्व आलं आहे. सफाई करताना कर्मचाऱ्याचा पाय सुरु असलेल्या एस्कलेटरमध्ये अडकला. फ्लोअर प्लेट तुटल्याने कर्मचाऱ्याचा पाय त्यात अडकला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्याचा पाय कापावा लागला.

एस्कलेटरची साफसफाई करणाऱ्या या कर्मचाऱ्याचा पाय अचानक एस्कलेटरमध्ये गेला. फ्लोअर प्लेट तुटल्याने त्याचा  पाय अडकला आणि तो कर्मचारी वेदनेने विव्हळत होता. मॉलमधील लोकांनी त्याला बाहेर काढण्य़ाचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही.

अखेर डॉक्टरांना बोलावून अडकलेला पाय कापल्यावरच या कर्मचाऱ्याची सुटका झाली. सध्या या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी एक महिला तिच्या मुलीसह एस्कलेटरवरुन येत असताना असाच अपघात झाला होता. त्यावेळीही फ्लोअर प्लेट तुटल्याने महिला त्यात अडकली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र महिलेच्या तत्परतेमुळे तिची मुलगी मात्र बचावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *