सरकारकडून पॉर्न साईट्सवर गुपचूप बंदी?, सोशल मीडियावर नाराजी

सरकारकडून पॉर्न साईट्सवर गुपचूप बंदी?, सोशल मीडियावर नाराजी

भारतात पॉर्न साईट्सवर बंदी घालायची की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण देशात कालपासून पॉर्नसाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याबाबत कोणतीही माहिती न देता सरकारने पॉर्न साईट बंद केल्या आहेत.

रेड ट्यूब आणि पॉर्न हब सारख्या लोकप्रिय अनेक साईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. साईट्स ओपन करताना दूरसंचारच्या निर्देशानुसार या साईट्स ब्लॉक केल्या आहेत असा संदेश झळकत होता.

सोशल मीडियावर नाराजी

साईट्स ब्लॉक केल्यानंतर अनेकांनी ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली. युझर्सनी ट्विटरवर #PornBan हा हॅशटॅगही ट्रेण्ड होत आहे. तर पॉर्न वेबसाईट्स बंद झाल्याने अनेकांनी आनंदही व्यक्त केला आहे.

खरंतर सर्वोच्च न्यायालयाने अशा साईट्सवर बंदी घालण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर अनेक साईट्स ब्लॉक झाल्याने ही बंदी सरकारनेच बंदी घातली का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

देशात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या प्रचंडभारतात पॉर्न साईट्स पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ पॉर्न हबच्या आकडेवारीनुसार 40 टक्के यूजर्स हे भारतात आहेत. मात्र सरकारने चलाखीने आणि गुपचूप पॉर्न वेबसाईट्सवर बंदी टाकल्याचा आरोप केला जात आहे.

तर दुसरीकडे काही युझर्स इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांवर आरोप करत आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएलने या वेबसाईट्स बंद केल्याचं काही युझर्सचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *