पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे कुटुंबिय एका हल्ल्यातून सुखरुप बचावले आहेत. पंतप्रधानांच्या ताफ्यात अनोळखी गाडी घुसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर संबंधित गाडीच्या चालकाला अटक करण्यात आलं आहे.
मुरीहून इस्लामाबादच्या दिशेने जाताना शरीफ यांच्या गाड्यांच्या ताफ्यात एका अनोळखी गाडीने प्रवेश केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली.
त्यानंतर लगेचच संबंधित चालकाला गाडीसह ताब्यात घेण्यात आलं. चालकाची चौकशी सुरु असून कारची नंबरप्लेट बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे.बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला तातडीने घटनास्थळी बोलवण्यात आलं आणि गाडीची तपासणी करण्यात आली.
गाडीच्या ताफ्यामध्ये पंतप्रधानांसह त्यांची पत्नी कुलसूम आणि कन्या मरियमही होत्या. घटनेनंतर पंतप्रधानांचं कुटुंब सुरक्षित निवासस्थानी पोहचलं आहे

