सातारच्या आमदाराचा पराक्रम, विरोधी प्रचार करणाऱ्याच्या कानपट्टीला बंदूक लावली

सातारच्या आमदाराचा पराक्रम, विरोधी प्रचार करणाऱ्याच्या कानपट्टीला बंदूक लावली

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या दादागिरीचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. आपल्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसाची बंदूक काढून, ती विरोधात प्रचार करणाऱ्या व्यक्तीच्या  कानपट्टीला लावण्याचा पराक्रम आमदार गोरे यांनी केला आहे. कुंडलीक यादव असं या व्यक्तीचं नाव असून, त्यांना आमदार गोरेंनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

गोरे हे माण तालुक्यातील आमदार आहेत. सातारा जिल्हातील माण तालुक्यातील पळसावडे ग्रामपंचायतीची निवडणुक सुरु आहे. या निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या रागातून, गोरे यांनी कुंडलिक यादव यांना मारहाण केली. तसंच त्यांनी  आपल्या सिक्युरीटी गार्डचे रिव्हॉल्वर घेऊन ते कुंडलीक यादव यांच्या कानपट्टीला लावले.

यामध्ये यादव यांच्या कानाला दुखापत झाली असून शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.

याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र अद्याप गोरेंना अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *