पश्चिम बंगालमधील महत्वाच्या राज्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गेले काही दिवस पश्चिम बंगालला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे.
आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे 39 लोकांचा मृत्यू झाला असून, 7 लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात पश्चिम बंगालमध्ये 60 टक्के रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे.
आजच्या पावसाचा फटका कोलकात्यातील रेल्वे सेवेलाही बसला. कोलकाता, सियालदाह, हावडा रेल्वे स्थानाकातील रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे.
कोलकात्यासोबत मिदनापूर, बांकुरा,बीरभूम,बर्धमान जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला आहे.

