बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीत शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (२४ फेब्रवारी) रात्री नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याची बारावीची परीक्षा सुरू होती. परिक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ‘अकोले शहरातील सारडा पेट्रोलपंपाच्या मागे डॉ. मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लॅबच्या हुकला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मॉर्डन हायस्कूल अकोले येथे विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये तो शिकत होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. त्याचे वडिल शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली होती. सौरभ दुपारपासून एकटाच घरी होता. तो दुपारपासून फोन उचलत नव्हता. रात्री नऊ वाजता नातेवाईक घरी आल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्याने परिक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा, अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *