विजेची तार तुटून गोठयावर पडल्याने नऊ गायींचा मृत्यू

विजेची तार तुटून गोठयावर पडल्यामुळे नऊ गायींचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कनोली येथे ही घटना घडली. अचानक नऊ गायींचा मृत्यू झाल्यामुळे नानासाहेब ठकाजी वर्पे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वर्पे यांच्या घराजवळ असणाऱ्या गोठयावरुन विजेची मुख्य तार जाते. अचानक ही तार तुटून गोठयावर पडल्यामुळे गोठयात बांधण्यात आलेल्या नऊ गायींचा मृत्यू झाला.

ऐन दुष्काळात ही घटना घडल्यामुळे वर्पे कुटुंबाच मोठ आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *