राज ठाकरे राळेगणसिद्धीत, अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती

लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे  यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून अण्णांना पाठिंबा दिल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज यांनी राळेगणसिद्धी  इथं जाऊन अण्णांची भेट घेतली.

अण्णाच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळं त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळं सरकारवरही दबाव वाढला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आज पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं अण्णांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी राज   यांनी उपोषणस्थळी जाऊन अण्णांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. लवकरच राज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *