प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे सापडले पाकिट

कल्याणचा विकास जाधव दुचाकीवरून नवी मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांचे पैशाचे पाकिट डोंबिवलीच्या पलावा सिटी समोरील रस्त्यावर पडले होते. सात ते आठ हजार रुपये आणि महत्त्वाच्या कागदपत्रे त्यामध्ये होते. मात्र एका प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे हे पाकिट जाधव याला मिळाले. जाधव याचे पाकिट हरवल्यानंतर टीएमटी चालकाला हे पाकिट सापडले. त्यांनी या पाकिटची पाहणी केली. परंतु त्यामध्ये जाधव याचा क्रमांक नव्हता. त्यामुळे त्याच्या नावाच्या आधारे फेसबुकवर शोध घेऊन तेथून नंबर घेऊन विकास याच्याशी संपर्क कऱण्यात आला. त्यानंतर त्याला बोलवून त्याचे पाकिट परत केले. चालक सतिश केसाडे आणि वाहक उमेश पुटेनकर अशी या बसचालक आणि वाहकांची नावे असून त्यांनी हे पाकिट परत केल्यानंतर विकासला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आपले पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याच्या भावना जाधव यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *