सलमान खानला भेटण्यासाठी बॉर्डर क्रॉस, पाकिस्तानी महिला अटकेत

सलमान खानला भेटण्यासाठी बॉर्डर क्रॉस, पाकिस्तानी महिला अटकेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे फॅन फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काहीही करण्यास तयार आला. सलमानची फॅन असलेली एक पाकिस्तानी महिला त्याला भेटण्यासाठी चक्क बॉर्डर क्रॉस करुन भारतात आली. मात्र गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी तिला 30 जुलै रोजी जालंधर स्टेशनला अटक केली.

अटारीहून दिल्ली जाणाऱ्या विशेष ट्रेनमधून ही पाकिस्तानी महिला प्रवास करत होती. या महिलेकडे व्हिजा किंवा पासपोर्ट नसल्याने जीआरपी पोलिसांनी गुरुवारी रात्री जालंधर स्टेशनवर तिला अटक केली.

चौकशीदरम्यान महिलेने सांगितलं की, ‘बजरंगी भाईजान’ म्हणजे सलमान खानला भेटण्यासाठी भारतात आली आहे. मी माझ्या मामासोबत प्रवास करत होते आणि माझा पासपोर्ट आणि व्हिजा त्यांच्याकडेच आहे, असंही तिने सांगितलं. ही महिला पाकिस्तानच्या कराचीमधील रहिवासी आहे आणि तिचं नाव चंदा आहे.

दरम्यान, या महिलेला जालंधरच्या पुढे प्रवास करायला दिला नाही, असं पोलिसांनी सांगितलं. ही महिला अटारीहून ट्रेनमध्ये चढल्याने तिला अटारी पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *