व्यापाऱ्याचा प्लॉट बळकावला; दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

गारखेडा परिसरात असलेला एका व्यपाऱ्याचा कोट्यावधी रुपये किमतीचा प्लॉट बळकाविल्याचा गुन्हा जवाहर नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणात राहुल चाबुकस्वारसह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राहुल हा भाजपचा सदस्य असून त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पानदरिबा भागात राहणारे मिथून सतीश व्यास (३६) यांनी तक्रार दिली. या तक्रारीत त्याची जवाहारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे गारखेडा भागात भूमापन क्रमांक १५१८७/ अ / ६६ यावर राहुल चाबुकस्वार, वसीम खान, इम्रान खान, मुदस्सीर खान, शेख रहीम, शेख सलीम आणि इतर दोन महिलांनी संगनमत करून बोगस कागदपत्र तयार करून बेकायदा कब्जा केला़ या लोकांनी सदर प्लॉटवर पत्र्याचे शेड टाकून ठाण मांडले होते. व्यास त्यांना समजाविण्यासाठी गेले असता या लोकांनी त्यांना खंडणीची मागणी केली. तसेच व्यास यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे़ या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *