लोकलमध्ये प्रवास करत असलेले दोन कॉलेज युवक गर्दीच्या रेट्यामुळे रेल्वेमार्गावर पडल्याचा आणि त्यातील एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी सायन ते माटुंगा स्थानकांदरम्यान घडली. मृत युवकाचे नाव गुलशन यादव असून, अभिषेक शर्मा हा युवक जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन येथील टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायन-माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी रुळाला तडे गेल्यामुळे लोकल वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी उसळली होती. लोकलमधील गर्दीचा रेटा सहन न झाल्यामुळे हे युवक पडले असावेत, अशी प्राथमिक शक्यता रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या दोघांनी सायन स्थानकातून लोकल पकडली होती. मात्र, दोघेही दरवाज्यावर लटकत होते. लोकल काही अंतर पुढे गेली असता दोघेही तोल जाऊन खाली पडले. रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, उपचारादरम्यान गुलशनचा मृत्यू
