पतंगामुळे जयपुरमध्ये ३०० जखमी

मकर संक्रांती निमित्त जयपूर शहराचा आसमंत रंगीबेरंगी पतंगांनी भरून गेला होता.पण याच पतंगांमुळे शहरात तब्बल ३०० जण गंभीर जखमी झाले. शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये दिवसभर जखमींनी रांगा लावल्या होत्या.

मकर संक्रातीला पतंगामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी जखमींचे प्रमाणही लक्षणीय आहे. सवाई मानसिंग रुग्णालयातच २२७ रुगणांवर काल उपचार करण्यात आले. शहरातील ४५ रुग्ण पतंगांमुळे गंभीर जखमी झाले आहेत तर ४१ रुग्ण मांजामुळे गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णांच्या जखमा शिवणे,मलमपट्टी करणे, एक्सरे काढणे अशा कामांमध्येच रुग्णालयांचा बहुतांश वेळ गेला.

कटलेली पतंग पकडण्याच्या नादात एक चार वर्षाचा मुलगा गच्चीवरून खाली कोसळला. त्याच्या मेंदुला गंभीर जखमा झाल्या आहेत. तर पतंग पकडण्याच्या नादात मासूम आलम एका दुचाकीसमोर आला आणि त्याला त्याचे पाय गमवावे लागले. मांजा गळ्यात अडकल्याने,पतंग चेहऱ्यासमोर आल्याने देखील मोठ्याप्रमाणात दुचाकीस्वार जखमी झाले. पतंगांमुळे होणाऱ्या अपघात थांबवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *