अल्पवयीन मुलीवर सटाण्यात बलात्कार

शहरातील चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडावर एका नरधामाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केल्याने शहरात खळबळ उडाली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने सटाणा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी ऋषीकेश शरद सूर्यवंशी (वय २१) या युवकाय अटक केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलगी सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास किराणा घेण्यासाठी दुकानात गेली असता ऋषीकेशने अंधाराचा फायदा घेत तिला चाकूचा धाक दाखवला. चापटीने मारहाण करीत आरडाओरड केल्यास मारून टाकेल, असा दम देत मंदिराच्या मागे नेले. त्याच ठिकाणी तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून बलात्कार केला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायदासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, दुपारी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पाल, सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *