पोस्टातून दीड लाखांची रोकड गायब

कोपरीतील पोस्ट ऑफिसमधून दीड लाखांची रोकड चोरीला गेली असून हा प्रकार शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजण्यादरम्यान घडला आहे. कोपरी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक व्यक्ती हातात कागद घेऊन पोस्टात आला होता आणि हा व्यक्ती पोस्ट मास्तरच्या टेबलसमोर उभा राहिला. यावेळी पोस्टमास्तरने बाहेर काऊंटरवर जाण्यास सांगितले. मात्र, कॅश काऊंटरमधील दीड लाखांची रोकड चोरून ही व्यक्ती पळून गेली. कॅश काउंटरची पाहणी केल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. चोरीला गेलेल्या रकमेमध्ये दोन हजारांच्या ७५ नोटा असून पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे वय अंदाजे ४० वर्ष असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *