पेट्रोल होईल ३४ रुपये लीटर

‘वितरकांचे कमिशन आणि सर्व कर वगळले तर, राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ३४.०४ रुपये प्रती लिटर आणि डिझेलची किंमत ३८.६७ रुपये प्रती लिटर होऊ शकते,’ अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली आहे.

 इंधनांच्या दरांबाबत १९ डिसेंबरला विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पेट्रोलच्या दरात कर आणि वितरकांचे कमिशन याचा हिस्सा एकूण दराच्या ९६.९ टक्के असतो. तर, डिझेलमध्ये तो ६०.३ टक्के असतो. त्यामुळे मूळ दरात वाढ होते.’ १९ डिसेंबर रोजी पेट्रोलचा किरकोळ दर ७०.६३ रु. होता. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क १७.९८ रु., राज्याचा ‘व्हॅट’ १५.०२ रु. आणि वितरकांचे कमिशन ३.५९ रु. होते,’ असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *