चंदनवाडीमध्ये याकूबचा दफनविधी ?

फाशी दिल्यानंतर याकूबचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला असून, कुटुंबिय याकूबचा मृतदेह घेऊन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. विमानाने याकूबचा मृतदेह मुंबईत आणण्यात येणार आहे.

मरीनलाईन्स जवळील चंदनवाडी येथील मुस्लिम दफनभूमीत याकूबवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. मेमनचे वडील अब्दुल रझ्झाक आणि त्याच्या काही कुटुंबियांचे त्याच ठिकाणी दफनविधी झाला आहे.

याकूबच्या माहीम येथील निवासस्थानी आणि चंदनवाडीतील मुस्लिम दफनभूमीजवळ सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याकूबच्या फाशीनंतर कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी संपूर्ण मुंबईत सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी मुस्लिम समाजातील नेत्यांना याकूबच्या फाशीनंतर कुठलेही वक्तव्य करु नका अशी विनंती केली आहे. याकूबच्या फाशीनंतर प्रक्षोभक वक्तव्य झाले तर, पोलिसांकडून कारवाई होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.

सर्व पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना मुंबईतील संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहे. मेमन कुटुंबिय रहाते त्या माहिमच्या अलहुसैनी इमारतीबाहेर तात्काळ कृती दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या काही समाजकंटकांना आधीच ताब्यात घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *