माजी राष्ट्रपती कलाम यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर

माजी राष्ट्रपती कलाम यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यावर रामेश्वर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होत आहेत.

जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जाणा-या कलाम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांसह लाखो नागरिकांचा जनसागर रामेश्वरमध्ये लोटला आहे.

कलाम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कलाम यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू रामेश्वरममध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांनी पुष्पचक्र अर्पण करुन कलाम यांना आदरांजली वाहिली.

दिल्लीहून हवाई दलाच्या विशेष विमानाने कलाम यांचे पार्थिव मदुराईला आणले. तेथे तामीळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने रामेश्वरमला नेले. येथून १० किलोमीटरवरील मंडपम येथील हेलिपॅडवर दुपारी ४ वाजता त्यांचे पार्थिव उतरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *