याकूबच्या अंत्ययात्रेला परवानगी नाही

याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणार हे जवळपास निश्चित झाले असून मुंबई पोलिसांनी त्याच्या अंत्ययात्रेस मात्र परवानगी दिलेली नाही. एअर अॅम्ब्युलन्सने याकूबचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे.

१० ३० च्या सुमारास याकूबचा मृतदेह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी याकूबचे भाऊ उस्मान आणि सुलेमान नागपूर कारागृहात दाखल झाले असून अद्याप याकूबचा मृतदेह त्यांना सोपवण्यात आलेला नाही. राज्याचे अतिरीक्त गृह सचिव के. पी. बक्षी यांनी याकूबच्या मृतदेहाबाबत पुढील निर्णय तेथील परिस्थितीनुसार कारागृह अधिक्षक घेतील, असे स्पष्ट केले.

चंदनवाडीजवळ असलेल्या कब्रस्तानात याकूबवर दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे. कब्रस्तानाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याकूबचा मृतदेह विमानतळावरून थेट कब्रस्तानात नेला जाणार की आधी त्याच्या घरी मृतदेह नेला जाईल, याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *