राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला नितीन गडकरी आले होते. त्यांचं भाषण संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झालं. त्याचवेळी त्यांना भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरलं. त्यानंतर तेथील पस्थितांनी गडकरींना तातडीनं रुग्णालयात हलवलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान, नितीन गडकरी यांनी ट्विट करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. तसंच हितचिंतकांचे आभार मानले.
