कोका कोला इंडिया कंपनीच्या विक्रीमध्ये यावर्षी प्रथमच घट झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत गेल्या दशकात उत्पादनात घट करण्याची प्रथमच वेळ ‘कोका कोला इंडिया‘वर आली आहे. कोका कोला देशातील सर्वांत मोठी पेय तयार करणारी कंपनी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा विक्रीचा दर फक्त एक अंकी आकड्यावर आला आहे. परंतु कंपनीने किती घट झाली याबद्दल आकडेवारी स्पष्ट केलेली नाही. विश्लेषकांच्या मते, विक्रीचा दर चार-सहा टक्क्यांवर पोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कोका कोला इंडीयाच्या विक्रीत दोन अंकी वाढ नोंदवण्यात आली होती.
जून तिमाही पेय बनवणार्या कंपन्यांसाठी सहसा चांगला मानला जातो. “कारण उन्हाळ्यात विक्रीत लक्षणीय वाढ होते. परंतु आता जून तिमाहीत विक्री घसरल्याने कंपनीसाठी कमी झालेला नफा भरून काढणे मोठे आव्हान आहे.
कोका कोला इंडिया विक्रीतील वाढ आणि वर्ष खालीलप्रमाणे: (वार्षिक आधारावर)
वर्ष विक्रीतील वाढ
एप्रिल-जून, 2015 -4-6%
जानेवारी-मार्च, 2015 10 +%
वर्ष 2014 10 +%
2013 4%
2012 16%
2011 12%

