हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बलात्काराची घटना उघड झाल्यानं हिंगोली शहरात काल तणावपूर्ण वातावरण होतं. बावनखोली भागात सात वर्षाच्या मुलीला शेजाऱ्यानं पैशांचं आमिष दाखवलं आणि गच्चीवर नेऊन बलात्कार केला. मधुकर वाठोरे असं या नराधमाचं नाव आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अधिनियमानुसार हिंगोली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. रविवारी मुलीच्या घरी कोणी नसल्याचं पाहून शेजारच्या मधुकर वाठोरेनं मुलीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्रास झाल्यानं मुलीनं ही घटना वडिलांना सांगितली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र तत्पूर्वी संतप्त नातेवाईक आणि परिसरातल्या नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली. तसंच बस स्थानकातल्या काही बसेसवर दगडफेक केली, त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *