सीएम चषक कार्यक्रमात नृत्य करताना मुलीचा मृत्यू

सीएम चषक कार्यक्रमात नृत्य करत असताना एका १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कांदिवलीतील लालडी पाला येथे घडली. अभिलाषा शर्मा असे मृत मुलीचे नाव असून ती सीएम चषक कार्यक्रमातील नृत्य स्पर्धेत सहभागी झाली होती.

अधिक माहिती अशी, अभिलाषा शर्मा ही सीएम चषकाच्या मंचावर नृत्य करत होती. त्यावेळी अचानक ती खाली कोसळली. तिला त्वरीत जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अभिलाषाच्या नातेवाईकांनी कांदिवली पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *