लसीकरणानंतर तीन महिन्याच्या बालकाचा मृत्यू

तीन महिन्यांच्या लहान बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावात घडली आहे. संतप्त पालकांनी त्या बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला असून संबंधीत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कौठाळी येथील दत्तात्रय आटकळे यांच्या साडेतीन महिन्याच्या बाळाचा अंगणवाडीत वैद्यकीय पथकाने पेंटा व्हायलंटची लस दिली होती. लसीकरणानंतर त्या बाळाला त्रास होऊन त्याचा आज (बुधवार) पहाटे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *