डॉ. कलाम लोकांचे राष्ट्रपती होते- ओबामा

डॉ. कलाम लोकांचे राष्ट्रपती होते- ओबामा

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

अब्दुल कलाम लाखो लोकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत होते. मी अमेरिकन जनतेच्या वतीने कलाम यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतो.

शास्त्रज्ञ ते राजकारणी असा प्रवास करणारे अब्दुल कलाम कर्तुत्ववान नेते होते. ज्यांनी देशात-परदेशात आदर, किर्ती मिळवली असे ओबामांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

कलाम यांनी नेहमीच भारत-अमेरिका दृढ संबंधांचा पुरस्कार केला. १९६२ साली त्यांनी नासाला भेट दिली होती. भारत-अमेरिकेमध्ये अवकाश सहकार्य संबंध दृढ व्हावेत यासाठी कलामा यांनी काम केले होते असे ओबामांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधांना अधिक चालना मिळाली. डॉ. कलाम यांची विनम्रता आणि जनसेवेप्रती असलेली निष्ठा लाखो भारतीयांना आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देत राहील ख-या अर्थाने ते लोकांचे राष्ट्रपती होते असे ओबामा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *