सौरव गांगुली लवकरच होऊ शकतो कोच

सौरव गांगुली लवकरच होऊ शकतो कोच

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुली लवकरच कोचच्या भूमिकेत दिसू शकतो. त्याला बंगाल क्रिकेट टीमचा नवीन कोच म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगाल क्रिकेट टीम (सीएबी) गांगुलीला बंगाल क्रिकेट टीमचा कोच बनवण्यासाठी उत्सुक आहे. गांगुलीने हा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. अशोक मल्होत्रा हे सध्या बंगाल टीमचे कोच आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे.

गांगुलीही आधी बंगाल क्रिकेट टीमसाठी खेळलेला आहे. बंगाल क्रिकेट टीमचा नवीन कोच होण्याआधी गांगुलीला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल. जर बीसीसीआयने आक्षेप घेतला नाही तर, गांगुली युवा टीमला कोचिंग देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *