ओला, उबरचा पुन्हा संप

दिवाळीपूर्वी सलग १२ दिवस संपावर गेलेल्या ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी पुन्हा एकदा संपाचे शस्त्र परजले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेली चर्चेनंतरही कोणतेही ठोस लाभ पदरात न पडल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या शनिवारपासून पुन्हा संपाची घोषणा केली आहे.

सरकारी पातळीवरील चर्चा अयशस्वी ठरल्याने संपाचा निर्णय कायम आहे’, असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ‘यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाईल. त्याचप्रमाणे मंत्रालयावरही मोर्चा काढणार आहे’, असा निर्धारही सहभागी संघटनांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *