आली लहर केला कहर; वाढदिवसाच्या आनंदात नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका सरपंचाने हवेत गोळीबार केल्याचं प्रकरण ताजे असतानाच ठाण्यातील सेनेचे नगरसेवक संजय पांडे यांचे चिरंजीव निल पांडे यांनीदेखील हवेत गोळीबार केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपुर्वी लोणावळ्यात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत नील पांडे यांनी हवेत बंदुकीचा बार उडवून आनंद साजरा केला.

नगरसेवकाच्या मुलान अशाप्रकारे गोळीबार केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ती दिवाळीतली खेळण्याची बंदूक होती, असा दावा गोळीबार करणाऱ्या नील पांडे यांनी केला आहे.  तर गेल्या १० वर्षांपासून नगरसेवक असल्याने मला बदनाम करण्याचा हा कट आहे, असा दावा नगरसेवक संजय पांडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *