शनिवारी रात्री अक्षराचे काही फोटोज अचानक सोशल मीडियावर लीक झाले. हे फोटो खरे आहेत की बनावटी याची शहानिशा सध्या पोलीस करत आहेत. पण या प्रकारामुळे अक्षरा प्रचंड संतापली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून या प्रकारांना चाप बसायला हवा अशी विनंती तिने केली आहे. ती म्हणते, ‘देशात #मीटू सारख्या चळवळीतून मुली व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुलींचे आक्षेपार्ह फोटोज लीक करून काही लोक विकृत आणि आसुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे’.
ते फोटो अक्षराचेच असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दिला नसला तरी लीक झालेले फोटो माझेच असून मी सायबर क्राइमची बळी ठरली आहे अशी कबुली अक्षराने दिली आहे.
प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांची धाकटी कन्या हिचे खाजगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहे. या प्रकारामुळे अक्षरा संतापली असून तिने फोटो लीक करणाऱ्यावर ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका केली आहे.
