धमकी देऊन शिक्षकाचा बलात्कार

धमकी देऊन शिक्षकाचा बलात्कार

खासगी शिकवणीसाठी घरी येणाऱ्या विद्यार्थिनीवर गेल्या महिनाभरापासून शिक्षकाकडून वारंवार बलात्कार केल्याची बाब मंगळवारी दुपारी डोंबिवली पश्चिमेस उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी संदीप महाले (३४) यास विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा परिसरातील ओमय्या कॉम्प्लेक्स येथे राहणारा संदीप महाले हा खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी करतो. तो शाळेतील विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देऊन आपल्याकडे शिकवणीस येण्यास भाग पाडत असे. या धमक्यांना बळी पडून दहावीतील एक विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. शिकवणीच्या बहाण्याने शिक्षक संदीप महाले याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अखेर सततच्या लैंगिक शोषणाला कंटाळून या मुलीने आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशन गाठले आणि झाला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. आईवडिलांचे छत्र नसलेली ही मुलगी आपल्या काकांकडे राहत आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *